मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापडाच्या दुकानाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याला अचानक लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले.या बाबत अधिक माहिती अशी की मनमाड येथील सरदार पटेल रोड वरील प्रसिद्ध कापड दुकान मदनलाल ओमकरमल पारिक या दुकानाला सोमवारी रात्री p अकरा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून लाखो रुपयांचे ड्रेस मटेरियल, रेडीमेड ड्रेस तसेच साड्या जळून खाक झाल्या. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली. या आगीत सुमारे पन्नास लाखाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येते.

नाशिक जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...