मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील ज्येष्ठ ग्रंथपाल हमीद मन्सूरी यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री. मन्सूरी यांनी उपस्थितांना पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजीयानी यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी लाभले.
डाक कर्मचाऱ्यांना ‘इतका’ दिवाळी बोनस
केंद्र सरकारने डाक विभागातील पात्र कर्मचाऱ्यांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा उत्पादकता-संलग्न बोनस...











