loader image

दिवळीनिमित्ताने चव्हाण कुटुंबियांनी साकारली ‘किल्ले पन्हाळाची’ प्रतिकृती

Nov 14, 2023


योगेश म्हस्के

मनमाड : महाराष्ट्रात दिवाळी मध्ये घरगुती किल्ला बनवणे ही अनेक वर्षांपासून चालत असणारी परंपरा आहे.सध्याच्या डिजिटल युगात ही परंपरा काही प्रमाणात मागे पडत असताना दिसत आहे. दिवाळीतील हीच परंपरा जपण्याचे काम हे मनमाड येथील चव्हाण कुटुंब दरवर्षी करत असतात.

मनमाड येथील सिव्हिल इंजिनिअर श्री विक्रम चव्हाण आणि श्री अमर चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी मध्ये महाराष्ट्रातील आपल्या शौर्याचा इतिहास सांगणारे गड-किल्ले यांची प्रतिकृती साकारत असतात. घरातील तसेच शहरातील लहान मुलांना आपल्या गड-किल्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी , या उद्देशाने हे किल्यांची निर्मिती करत असतात.मागील वर्षी चव्हाण परिवाराकडून तोरणा किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली होती.यंदाच्या वर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ले पन्हाळाच्या प्रतिकृतीची निर्मिती केली आहे , हा किल्ला बनविण्या करीता दगड , विटा , माती अश्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केलेला आहे.

 

यंदाच्या वर्षी या किल्ल्याची प्रतिकृती सादर करून या परिवाराने यंदा नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशिद यांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे.
हा किल्ला बनविण्या करीता आराध्य , शिवराज , आदित्य , रितिक , श्रावणी , सेजल या चव्हाण भावंडांनी मेहनत घेतली.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.