कृष्णा व्यवहारे ला सुवर्णपदक छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ जूनियर व सीनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळा व गुड शेफर्ड्स हायस्कुल च्या कृष्णा संजय व्यवहारे याने चुरशीच्या लढतीत ४९ किलो वजनी गटात कोल्हापूर व जळगाव च्या खेळाडूंची कडवी लढत मोडीत काढत आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत ७५ किलो स्नॅच व ९८ किलो क्लीन जर्क असे १७३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आयुष बाळू देवगीर व अभिनव किशोर राजगुरू यांनी चांगली कामगिरी केली यशस्वी खेळाडूला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे गुड शेफर्ड्स स्कूलचे प्राचार्य क्लेमेंट नायडू क्रीडा शिक्षक मनोज देशपांडे लकी रिसम छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी कृष्णा चे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिक जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...