loader image

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

Nov 18, 2023



नांदगांव : मारुती जगधने
दिपावली, भाऊ बीज सन साजरा करायला ये जा करणार्या महिलांना गळ्यातील सोन्याची दागिने गमवायची वेळ आली आहे नांदगांव बस स्थानकात तथा बस मध्ये चढ उतार करताना महिलांच्या अंगावरील सोन साखळ्या चोरीला जात असल्याची घटना घडली या घटनेने महिला वर्गात एकच चर्चा उमटली सध्या नांदगांव बस स्थानकात. प्रवाशांची गर्दी असून त्यात प्रवास करणार्या
महिलांचे प्रमाण अधिक आहे याचाच फायदा घेत नांदगाव बस स्थानकात नांदगाव चाऴीसगाव बस कंमाक MH 07 C 9262 या बस मध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरी करणार्या महिला नी चला चला पुढे करत घाई गर्दी करीत नांदगाव बस स्थानकातूंन सुटणार्या या बस मधिल बेबीबाई बंडू नागरे वय वर्ष 70 राहणार पिंपऴवाड तालुका चाऴीसंगाव या वयोवृद्ध महिले चे 7 ग्रॅम चे डोरले लपास केले तर त्याच्या पुढे असणारी महिला उषा बाई जाधव वय वर्ष 49 राहणार शिवणी तालुका भडगाव या महिलेची देखील सव्वा तोऴया ची चैन लपास करुन पोबारा केला बेबी बाई नागरे यांच्या लक्षात आले कि आपली सोनसाखऴी चोरी झाली तर आजुबाजुच्या महिलांनी देखील आपआपल्या चैन तपासून बघितल्या तर उषा बाई जाधव यांची देखील चैन चोरी झाली चालक यांनी नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये बस घेतली शहानिशा झाली परंतु चोरटे अगोदर च फरार झाले होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.