loader image

सावाना चा यंदाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार ना. भारती पवार यांना जाहीर

Nov 18, 2023


पावणे दोनशे वर्षांची परपंरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा कै. माधवराव लिये स्मृती कार्यक्षम खासदार पुरस्कार नाशिक जिल्ह्यातीलच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या जानेवारी महिन्यात या पुरस्काराचे वितरण नाशिकमध्येच होणार आहे. स्व. माधवराव लिमये हे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजावादी नेते होते. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. ते पत्रकार, लेखक तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. स्व. लिमये यांच्या स्मृतिनिमित्ताने यापूर्वी कार्यक्षम खासदार पुरस्कार दिला जात असे. मात्र, आता या पुरस्काराची व्याप्ती ‘वर्षाआड कार्यक्षम खासदार पुरस्कार
देण्यात येतो. त्यानुसार या पुरस्कारासाठी यंदा डॉ.भारती पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे प्रमुख सचिव डॉ. धर्माजी
बोडके यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.