loader image

नांदगांव शहर समस्यांनी भरलेले बकालांचे घर ?

Nov 24, 2023


नांदगांव: मारुती जगधने – नांदगांव शहरातील नागरी समस्या सोडवणे बावत् शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या वतीने नगरपालिका मुख्यधिकार्यांना निवेदन देण्यात आले निवेदनातील अशय असा
नांदगांव शहराच्या सर्व भागामध्ये मोठया प्रमाणात धूळ (डष्ट) असून त्या मुळे नागरिकांना पायी चालने ही मुश्किलीचे झाले असून शहराच्या सर्वच भागामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवून धुळीपासून शहरास मुक्त करावे.
नांदगावचा शहरातील अस्वच्छ वातावरणामुळे मच्छराची संख्या वाढली असून त्यामुळे शहरात रोगराई चे प्रमाण वाढते असून त्यावर उपाय योजना करण्यात यावा,नांदगांव शहरातही महात्मा फुले चौकातील गाळे गेली 10 ते 12 वर्ष पडून आहेत लोक रस्त्यावर बसले असून गाळ्याचे वितरण लवकरात लवकर करण्यात यावे,
शहरातही बऱ्याच शौचालये बंद करण्यात आली असून रोड व खुल्या जागेतील हागणदारी वाढली असून यावर उपाययोजना करण्यात याव्या, नांदगांव शहराला स्वच्छ वेळेवर व पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा,
मालेगांव रोड वरील शनी मंदिर येथील गार्डनला अत्यंत भकास स्वरूप आले असून गार्डन दुरुस्ती करून पूर्वी प्रमाणे देखभाल दुरुस्ती करण्यात यावी.
,नांदगांव शहराची अंडर पास मध्ये पाईप लाईन लिकेज मुळे गेले वर्षभर वाया जाणारे लाखो लिटर पाणी लिकेज बंद करून पाणी वाचवावे व अंडर पास मध्ये पाणी भरल्या मुले नागरिकाने व महीला भगिनींचे व लहान मुलांचे होणाऱ्या हाल पासून दिलासा द्यावा
, नांदगाव शहरातील दोन्ही स्मशानभूमीमध्ये घाणीचे साम्राज्य बघता स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी
वरीलप्रमाणे मागण्या करण्यात येत असून वरील मागण्यांवर योग्य कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण/आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले निवेदकच्या
प्रति जिल्हा अधिकारी नासिक
, तहसीलदार नांदगांव
,अभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा
,उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगांव,पोलीस निरीक्षक नांदगांव पो ठाणे,
उपअभियंता पाणी व्यवस्थापनदेखभाल दुरुस्ती पथक उप विभाग जिल्हा परिषद नासिक, मालेगाव यांना देखील निवेदन प्रत देण्यात आल्या .दरम्यान यावेळी मुख्यधिकारी विवेक धांडे यांच्याशी चर्चा करताना
संतोष गुप्ता ता प्रमुख, श्रावण आढाव शहर प्रमुख, लताताई कळमकर महिला आघाडी शहर प्रमुख ,चेतन शिंदे उप शहर प्रमुख ,दिलीप नंद ,सुभाष कवडे, ज्ञानेश्वर पवार ,अतुल कासलीवाल ,राहुल दरगुडे, तेजस बोराळे ,दिलावर इनामदार ,संदीप पांडे, अंबादास कसबे ,नाविद शेख ,विजय बडोदे ,धनराज मंडलिक ,पप्पू आव्हाड ,संजू काळे, सनी शिंदे,आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.