loader image

ग्रामसेवीका विरूद्ध मंगळणे ग्रांमपंचायत महिला सरपंचाचे उपोषन

Nov 28, 2023

नांदगाव : मारुती जगधने
ज्या ग्रामसेवकाची नियुक्ती गावाचा विकास करणेकामी केलेली असते ते ग्रामसेवक जर स्थानिक ग्रामपंचायत सदस्याना विश्वासत घेत नाही मनमानी कारभार करतात, कुणाचे एैकुन घेत नाही अशा ग्रामसेविका
विरोधात मंगळणे ता. नांदगाव ग्रांमपंचायतीचे सरपंच, सदस्य,नागरिकांनी उपोषण पुकारले असून मंगळणे येथील महिला ग्रामसेवक श्रीमती एच पी आहेर ह्या अकार्यक्षम असल्याचा ठपका सरपंच व सदस्यांनी ठेवला आहे .
दि २८ नोव्हेंबर रोजी मंगळणे ग्रामस्तानी नांदगाव पंचायत समिती प्रवेशव्दारावर
पुकारलेल्या उपोषणात म्हटले की ग्रामसेविका मंगळणे येथे कर्तव्यावर ( रूजू ) झाल्यापासून आठ महिण्यात ग्रामपंचायतीच्या मासीक बैठका घेतल्या नाही.दि २८/२/२३ रोजी दमबाजी करुन प्रोसडिंगबुकवर पुढील पाच महिण्याच्या ग्रांमपंचायत सदस्या कडुन सह्या बळजबरीने करुन घेतल्या ग्रामसेवीकेच्या अकार्यक्षमते बाबात वरिष्ठांशी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत .ग्रामसेविका ग्रांमपंचायत सदस्याना खोट्या प्रकरणात आडकवण्याचे प्रयत्न करणे,सरपंचाचे मानधन आडवुन ठेवने, प्रोसडिंग बुक स्वता: हा जवळ ठेवने ,दि १ मे रोजी ग्रामसेवक विरोधात केलेल्या उपोषणा संदर्भात कारवाई झाली नाही, मंगळणे गावातील पथदिपांची स्थिती बंद आहे .नळाला पाणी नाही,गावातील नागरीसुवीधा विस्कळीत आहेत.
यास्तव सुरु असलेले उपोषनाची दखल घ्यावी यासाठी उपोषन सुरु केले आहे .निवेदनावर सरपंच वैशाली पवार यांची सही आहे त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य आणी नागरीक उपोषनस्थळी थांबुन आहे .

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.