मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिना निम्मित त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व उपशिक्षक शानूल सुभाष जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक भुषण शेवाळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.यावेळी संस्थेच्या सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजियानी,शाळेचे ज्येष्ठ शिक्षक शेख आरिफ कासम व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास संस्थेच्या सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी बहरणार यंदाचा भीमोत्सव २०२५
मनमाड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'भीमोत्सव २०२५' कार्यक्रमाचे आयोजन...










