नाशिक — उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविणाऱ्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने फिजिओथेरपी विभागला नाशिक मध्ये सुरवात करण्यात आली आहे.हा नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपक्रम सर्व वयोगटातील रुग्णांसाठी असेल, अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टर व फिजिओथेरपिस्ट टीम या विभागात कार्यरत असणार आहे.
फिजिओथेरपी विभागाचे उद्घाटन मेडिकव्हर समूहाचे सीबीओ महेश देगलूरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी फिजिओथेरपी विभागाबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितले की, कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यानंतर शरीराला नवचैतन्य येण्यासाठी फिजिओथेरेपी हि काळाची गरज आहे. मेडिकव्हर हॉस्पिटलने आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या ह्या वचनबद्धतेला या उपक्रमा द्वारे अधोरेखित केले आहे . या उपक्रमात रुग्ण त्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळापत्रकात व्यत्यय न आणता त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊ शकतील. आरोग्य विषयक आव्हानांना तोंड देत असलेल्या रुग्णांना याचा लाभ होईल. सर्वसमावेशक फिजिओथेरपी विभाग हि आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संकल्पना आहे असेही ते म्हणाले.
केंद्र प्रमुख डॉ सौरभ नागर म्हणाले कि, फिजिओथेरपी विभाग अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि उच्च कुशल फिजिओथेरपिस्ट सर्व वयोगटातील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास तत्पर आहे. मस्कुलोस्केलेटल, न्यूरोलॉजिकल, कार्डियाक, ऑर्थोपेडिक ,रेस्पीरेटरी फिजिओथेरपी, स्पोर्ट्स इंज्युरी रिहॅबिलिटेशन आणि इतर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देत असलेल्या रुग्णांसाठी जीवनाचा दर्जा उंचावणे हे ह्या विभागाचे उद्दिष्ट आहे.
या प्रसंगी कुशल व अनुभवी तज्ज्ञांची टीम रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

