महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब,उपजिल्हा रुग्णालय, मनमाड व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून विविध प्रकारच्या रांगोळ्या,पोस्टर्सद्वारे एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती महाविद्यालयात तसेच उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे करण्यात आली.या पोस्टर्समधून एचआयव्ही एड्स तसेच त्या रूग्णांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन या संदर्भातली माहिती प्रस्तुत करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे डी वसईत, लॅब टेक्निशियन जितेंद्र बिरारी व समुपदेशक निलेश मोरे यांनी मार्गदर्शन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांनी एच आय व्ही एड्स या आजाराविषयीची समाजातील गैरसमज व त्यावरील उपाययोजना या संदर्भातली विस्तृत माहिती उपस्थितांसमोर मांडली. या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन राऊत, प्रा.कविता काखंडकी, डॉ. विठ्ठल नजरधाने यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी डॉ.जे.वाय. इंगळे, डॉ. प्रमोद आंबेकर,कुलसचिव समाधान केदारे आदी याप्रसंगी उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.




