मनमाड – निवडणूक आयोगामार्फत नवमतदार नोंदणी साठी दिनांक *2/12/2023 व 3/12/2023* रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत असून 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या नवमतदारांची मतदार यादीत नावं नोंदणी करावयाची आहे त्यासाठी संबंधित वार्ड प्रभागातील BLO / रेशन दुकानदार यांचेकडे खालीलप्रमाणे कागदपत्र जमा करून नावं नोंदणी करून घ्यावी हि विनंती
*1)आधारकार्ड*
*2)शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयासठी जन्म तारखेचा पुरावा असलेले कागदपत्र*
*3)पासपोर्ट फोटो*
*4)कुटुंबातील इतर सदस्यांचे मतदान ओळखपत्र*
सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे.
मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 भरून बीएलओं/ रेशन दुकानदार यांचे कडे अर्ज जमा करावे
त्याशिवाय स्वत:च्या मोबाईलवरून किंवा ऑनलाइन पोर्टलवरूनही मतदार नोंदणी करणे शक्य आहे.
*नवमतदार ऑनलाईन नोंदणी कशी करावी*
■ नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले अॅप डाऊनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता अॅपद्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करता येते. त्यासाठी योग्य कागदपत्रे अपलोड करावी लागतात. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या मतदारांना नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. मृत मतदाराचे नाब नातेवाईक वगळू शकतात. तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येते. गुगल प्ले स्टोअरवरील https:// play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येईल.
तसेचvoters.eci.gov.in
या संकेतस्थळावरील पोर्टल द्वारे देखील नाव नोंदणी करता येईल.

राशी भविष्य : १० ऑक्टोबर २०२५ – शुक्रवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...