loader image

नांदगाव शहरातील बहुचर्चीत बेकायदेशीर गतिरोधक अहकर काढले खोदुन

Dec 5, 2023


नांदगाव : मारुती जगधने
४० गांव चांदवड नॅशनल हायवेवर
नांदगाव शहरातील हनुमाननगर वळणावरील बेकायदेशीर घातलेले गतीरोधक तोडण्याची नामुष्की नॅशनल हायवे विभागावर आली.या बेकायदेशीर गतीरोधकावरुन दुचाकी आदळून अनेक महिला, पुरुष जखमी झाले तसेच अनेक लहान मोठ्या वाहनांची पाटे, शाॅकप तुटले अनेक जन गतीरोधकावर घसरुन पडले या संदर्भातील बातम्या विविध पोर्टल, दैनिकात प्रसिध्द झाल्यावर संबंधीत यंञणेला जाग आली आणी सा.बा यंञणेच्या कर्मचार्यानी दि ५ डिसेंबर रोजी सदरचे गतिरोधक खोदुन काढावे लागले.
सध्या मनमाड नजिकचा रेल्वेउड्डान पुल तुटल्याने सर्वच वाहतूक मालेगांव, नांदगांव ,येवला ,संभाजीनगर , पुणे ,शिर्डी,अहमदनगर या मार्गाने वाहने वाहू लागली आहेत तसेच सदरचे गतीरोधक कुणाच्या तरी सांगण्यावरून झाले होते ते अनधिकृत असल्याने सतत येणार्या बातम्यामुळे गतिरधक खोदण्याची वेळ यंञणेवर आली दरम्यान गतिरोधक खोदून काढू असा इशारा जागृत नागरीक बापूसाहेब जाधव यांनी दिला होता.
नांदगाव हुन अवजड व इतर वाहने,बस यांची रहदारी वाढल्याने नांदगाव मार्गावरून एका दिवसाला हजारो वाहनांची वर्दळ असते.सध्या नांदगाव बसस्थानकाला तिन दिवसात सुमारे ३०० आगाराच्या बसने नांदगाव डेपोला थांबा दिला एवढीमोठी वाहतूक नांदगांव शहरातुन सध्या जात आहे .दरम्यान नॅशनल हायवेवर गतिरोधक घालण्यावर न्यायालयाने बंदी घातली असताना नांदगाव शहरात गतिरधक घातले जाते, वास्तविक नॅशनल हायवेला जोडणार्या मार्गावर गतिरोधक केले जाते येथे तर उलट झाले त्यामुळे अनेकजन गतीरोधकावरुन पडून जखमी झाले ते प्रमाण दैनंदिन होते. सध्या या मार्गावरुण अवजड वाहनासोबत इतर लाहानमोठी वाहने धावत आहे त्यात एक महिलेचा बळी देखील गेला. लहानसान अपघात झाले .सध्या नांदगांव पोलिसानी मोहिम सुरु करुन वाहतूक सुरळीत करणे व बेकायदेशीर वाहनावर दंडाची कारवाई करणे हे काम युद्धपातळीवर चालू आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.