नांदगाव. : मारुती जगधने
दि.10 डिसेंबर 2023 धुळे येथील अवधूत एंटरप्रायझेस यांच्या विद्येमाने देण्यात येणारा आदर्श व सर्वोत्तम व्यवस्थापक, मुख्याध्यापक हा पुरस्कार जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल नांदगांव चे मुख्याध्यापक . मणी चावला यांना देण्यात आला. धुळे येथे संपन्न झालेल्या प्रिन्सिपल मीट मध्ये एकूण 40 CBSE
शाळांचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते. या मीटमध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिविटी घेण्यात आल्या. या मध्ये गुणवंत प्राप्त शाळांचे व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची गुणवत्ता यांचा सखोल अभ्यास करून त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना गौरविण्यात येते. अवधूत इंटरप्राईजेस यांच्या या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यातील जे. टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक अव्वल ठरले.त्यांना या मीट मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, टीम बिल्डर इ. प्रकारचे पुरस्कार मिळाले. तसेच 11हजार रूपयांची रोख रक्कम मिळाली. म्हणून त्यांना सर्वोत्तम मुख्याध्यापक म्हणून गौरविण्यात आले.
.मणी चावला यांच्या ह्या पुरस्काराचे शिक्षक, विद्यार्थी पालक. यांच्याकडून कौतुक होत आहे. या यशाबद्दल
संस्थेचे चेअरमन मा सुनिलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा ,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,जुगलकिशोरजी अग्रवाल रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चादीवाल,सुशिलकुमार कासलीवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, मुख्याध्यापक शरद पवार, विशाल सावंत, यांनी मणी चावला यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...