इच्छापूर्ती गणेश मंदिर ते वरबारे दोन किलोमीटर अंतराचा रस्ता गावातील ग्रामस्थ पत्रकार व माहिती अधिकार संघटनेचे चांदवड तालुका अध्यक्ष श्री भागवत झाल्टे जिल्हा आदेक्ष आर के मामा समाधान आहेर (बंन्टी) पुंडलिक गुंजाळ नवनाथ जाधव यांनी निकृष्ट दर्जाचे चालू काम तात्काळ केले बंद संबंधित रस्त्याची चौकशी दि 05/06/2023 रोजी वडबारे गावचे ग्रामस्थ तथा जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विभाग नवनाथ युवराज जाधव यांनी चौकशी करण्यासाठीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यानां दिले होते सदर रस्त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ दि. 01/08/2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग इवद 3 यानां संबंधित रस्त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानंतर दि.21/08/2023 रोजी कार्यकारी अभियंता,उप कार्यकारीअभियंता,शाखा अभियंता व इतर दोन अधिकारी रस्त्याची चौकशी करण्यासाठी आले परंतु रस्त्याची सखोल चौकशी न करता अर्धवट चौकशी करून व उप कार्यकारी अधिकारी यांची मिटिंग लागल्या मुळे जिल्हा परिषद येथे तात्काळ पोहोचायचे आहे आसे सांगुन निघुन गेले तसेच तक्रारदार यांनी सदर त्याच दिवशी पत्रा द्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अर्ध्यवट चौकशी केल्याचे कळविले व आपण स्वता प्रत्येक्षस्थळी येऊन चौकशी करावी त्यानंतर दि.24 08 2023 रोजी स्वता कार्यकारी अधिकारी यांनी येउन रस्त्याची पाहणी केली व रस्ता अतिशय निष्कृष्ट दर्जाचं रस्ता असल्याचे निष्पन्न केले व जिल्हा परिषद प्रशासन केणत्याही ठेकेदाराला पाठीशी घालणार नाही कामाच्या दर्जाला प्रथम प्राधान्य राहणार आहेत संबंधित रस्त्यांचे काम करणार्या सर्वच घटकांची चौकशी केली जाईल असे आश्वासन स्थानिक ग्रामस्थांना दिले होते परंतु दिलेलं आश्वासन न पाळता उलट चौकशी अहवाल खोटा व नियमबाह्य बनवून ठेकेदारानां व अधिकारीर्यांना पाठीशी खालताना दिसून आले आहे त्यानंतर तक्रारदार याचं समाधान न झाल्यामुळे तक्रारदार यांनी अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कडे तक्रार केली व विभागीय आयुक्त यांनी जिल्हाअधिकारी नाशिक यानां फेर चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारदार यांनी सांगितले आहे. तसेच जिल्हाअधिकारी हे ठेकेदार व ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यावर काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.

एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...