loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

Jan 9, 2024


चांदवड तालुक्यातील रापली हद्दीत शेतकऱ्यांनी केले दुहेरीकरण रेल्वेचे काम केले बंद

आज दि 09/01/2024 रोजी चांदवड तालुक्यातील रापली हद्दीत शेतकऱ्यांनी केले रेल्वेचे दुहेरीकरण होत असलेले काम दुपारी २.३० च्या दरम्यान बंद केले. दौंड मनमाड रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प करिता भुसंपादन रेल्वे मार्गावर नगर चौकी रापली वागदर्डी हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे शेतकर्यांनी रेल्वेने सुरू केलेले हे काम थांबविले. ह्या प्रसंगी रेल्वेचे सूधांशु साहेब या संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना जो कोणी कामात अडथळा निर्माण करेल त्याला खड्डे करून गाडून देऊ असे वक्तव्य केले. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतापले जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे काम होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.ज्या स्थानिक जागा मालकाची जमीन गेली आहे त्यांचा प्रत्येकी एक मुलाला कामावरती घेण्यात यावे शेतकऱ्यांना शेतीचा मोबदल खू प कमी दरात दिला आहे त्याचीही पूर्तता वाढीव दर एक लाख 40 हजार रू गुंठ्या प्रमाणे तसेच विहीर मोजनीतील तफावतीची दखल घेण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर पगार, बापूभाऊ गागरे, साईराम गागरे,अशोक गागरे, कमल जमधाडे, सुमन सूर्यवंशी,सुनिता राजनोर,बाबासाहेब मोते,राजू गागरे, संजय घागरे,अनिल बिडगर, यशवंत संसारे. विक्रम हाके,रंजनाबाई राजनोर,गंगाधर मोते,वामन गागरे, सागर गागरे,रामदास गागरे, दत्तात्रय मोते, जालिंदर हाके,संजय मोते, शिवाजी संसारे व इतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.दरम्यान ह्या सर्व शेतकरी बांधवांनी तात्काळ प्रांत यांची भेट घेऊन ह्या सर्व प्रकारची तक्रार वजा कैफियत मांडली.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
.