loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – आ. सुहास  कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव मतदार संघात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण

बघा व्हिडिओ – आ. सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव मतदार संघात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विविध...

read more
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

निवडणूक आयोगाकडून आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला....

read more
सार्वजनिक ग्रंथालय बहुजनांची ज्ञान केंद्रे बनावीत : प्रतिभा शिंदे मुक्तीभूमी स्मारक व वाचनालयास दिली सदिच्छा भेट

सार्वजनिक ग्रंथालय बहुजनांची ज्ञान केंद्रे बनावीत : प्रतिभा शिंदे मुक्तीभूमी स्मारक व वाचनालयास दिली सदिच्छा भेट

येवला (प्रतिनिधी) महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व धर्मग्रंथा सोबत...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ची बैठक येवला रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाली.

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ची बैठक येवला रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाली.

यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून...

read more
भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी  नांदगाव चे सिद्वेश्वर ( बापु ) शिंदे यांची निवड

भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे सिद्वेश्वर ( बापु ) शिंदे यांची निवड

नांदगाव सोमनाथ घोंगाणे धनगर समाज संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष सिध्देश्वर (बापु) शिंदे यांची भारत...

read more
.