loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार ने महत्वाचा...

read more
पाकीझा चौफुली येथील हायमास्ट दिवे त्वरित चालु करावे : फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंचची मागणी

पाकीझा चौफुली येथील हायमास्ट दिवे त्वरित चालु करावे : फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंचची मागणी

मनमाड शहरातून जाणारा इंदोर - पुणे महामार्गावरील शहरातील मालेगाव नाका ते कॅम्प रोडवरील मुख्य जागी...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास गुरुपौर्णिमेच्या पर्वावर प्रा.मुकेश मिसर सर यांचे कडून ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास गुरुपौर्णिमेच्या पर्वावर प्रा.मुकेश मिसर सर यांचे कडून ग्रंथ भेट

मनमाड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम स्कूल...

read more
एशियन युथ ज्युनिअर सीनिअर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धा : आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

एशियन युथ ज्युनिअर सीनिअर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धा : आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर

मनमाड च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुराताशकंद उझबेकिंस्थान येथे होणाऱ्या एशियन युथ वेटलिफ्टिंग...

read more
१३ जुलै पासून बुद्धवाडीच्या कपिलवस्तू बुध्द विहारात  वर्षावास कार्यक्रम  प्रारंभ होणार

१३ जुलै पासून बुद्धवाडीच्या कपिलवस्तू बुध्द विहारात वर्षावास कार्यक्रम प्रारंभ होणार

बुद्धवाडीच्या कपिलवस्तू बुध्द विहारात आषाढ पौर्णिमा ते अश्विपौर्णिमा काळात राबविण्यात येणार...

read more
.