loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

मनमाड नगरपालिका कामगार सेवकांची सह.पतसंस्था निवडणूक : कामगार प्रगती पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ

मनमाड नगरपालिका कामगार सेवकांची सह.पतसंस्था निवडणूक : कामगार प्रगती पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ

मनमाड नगरपालिका कामगार सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकी पडघम वाजण्यास सुरुवात झाली...

read more
सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालय व जे. टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल चा दहावीचा 100%निकाल.

सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालय व जे. टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल चा दहावीचा 100%निकाल.

नांदगाव(१७जून) .. नांदगाव येथील श्री.माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यू.संस्थेच्या सौ. कमलाबाई...

read more
किसान माध्यमिक विद्यालय वाखारी ता . नांदगाव या विद्यालयाचा १० वी परिक्षेचा १००% निकाल

किसान माध्यमिक विद्यालय वाखारी ता . नांदगाव या विद्यालयाचा १० वी परिक्षेचा १००% निकाल

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयातील ५७ विद्यार्थी१० वी एस एस...

read more
नांदग़ाव शहरातील व्ही. जे . हायस्कुल या विद्यालयतील कु. सिध्दिका योगेश वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम

नांदग़ाव शहरातील व्ही. जे . हायस्कुल या विद्यालयतील कु. सिध्दिका योगेश वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम

नांदग़ाव येथील व्ही.जे.हायस्कूल मधील सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील मार्च २०२२ चा एसएससी निकाल...

read more
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी : मालेगाव येथे पत्रकार शंकर वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी : मालेगाव येथे पत्रकार शंकर वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

मालेगाव येथील जेष्ठ पत्रकार, दैनिक दिव्यमराठीचे मालेगाव कार्यालय प्रमुख श्री शंकर वाघ यांच्यावर...

read more
(बघा व्हीडीओ) केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना प्रशासनाविरोधात कामगारांचा आक्रोश मोर्चा

(बघा व्हीडीओ) केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना प्रशासनाविरोधात कामगारांचा आक्रोश मोर्चा

केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना मनमाड मध्ये 'आक्रोश मोर्चाचे' आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी...

read more
.