loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड शैक्षणिक सहल इमॅजिका खोपोली येथे संपन्न.

Jan 13, 2024

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल इमॅजिका पार्क खोपोली येथे जाऊन मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विशेष म्हणजे उर्दू व मराठी या दोन्ही माध्यमातील विद्यार्थी,विदयार्थीनी, मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे,संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम सहलीत उपस्थित होते.

सहल इमॅजिका खोपोली येथे पोहचताच तेथील हिरवळ व निसर्गरम्य भौगोलीक वातावरणाचा सर्वांनी आनंद घेतला. तसेच इमॅजिका पार्क मध्ये असलेल्या विविध प्रकारांचे आधुनिक इलेक्ट्रॉनिक झोके, बोटिंग सवारी. रोलरकोस्टर, स्नो पार्क, डॅशिंग कार, मनोरंजक हायवे कार, मि. इंडिया, अलिबाबा गुफा, डिजनीलँड, भूल भुलैय्या, संगीत कारंजा,कप बशी राईट,हत्ती राईट या विविध खेळांचा मनसोक्त आनंद लुटला.विदयार्थी, शिक्षकांनी स्नेह भोजन घेतले व खेळीमेळीच्या वातावरणात सहलीचा समारोप करण्यात आला.
संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी,मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर,शेख आरीफ कासम,शेख जाविद मुश्ताक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहल नियोजनपूर्वक यशस्वी केली. उत्कृष्ट नियोजन करुन सहल यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी, सचिव हज्जन सायराबानो सलीम अहमद यांनी संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी, मुख्याध्यापक भुषण शेवाळे सर, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम, शेख जाविद मुश्ताक व सर्व शिक्षक,शिक्षकेतर, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी, मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.