loader image
[ays_poll id=7]

तरुणांच्या कलागुणांना वाव देणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. हरीश आडके

Jan 15, 2024

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचे शिंगवे येथे उद्घाटन
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ,मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “युवकांचा ध्यास- ग्राम शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती” हे ब्रीद सोबत घेऊन शिंगवे येथे उद्घाटन संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटक महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष मा.डॉ. हरीश आडके यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये असणाऱ्या गती विधीचे विवेचन करून, तरुणांच्या कलागुणांना वाव देणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सुभाष निकम यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजना हि श्रम, कर्तव्य, देशप्रेम, असे विविध गुण स्वयंसेवक व स्वयंसेविकांना प्रात्यक्षिक रित्या शिकवते. मराठा विद्या प्रसारक मंडळाचे माजी संचालक श्री नानासाहेब भुसाळ व श्री. दाते यांनी ही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मौजे शिंगवे येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र गांगुर्डे यांनी राष्ट्रीय सेवा योजने बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषभ अहिरे व श्रद्धा उगले,प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.पवनसिंग परदेशी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. कविता काखंडकी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.विठ्ठल नजरधने यांनी केले. याप्रसंगी शिंगवे गावचे मा.सरपंच आत्माराम खताळ,
महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. डॉ. बी.एस. देसले, कुलसचिव श्री. समाधान केदारे ,कार्यालयीन अधीक्षक श्री.एल. के. निकम , पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे , पर्यवेक्षक प्रा . विठ्ठल फंड ,डॉ एम.डी.अहिरे,प्रा.चैतन्य ठाकूर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय गवळी,मा. ग्रामसेवक, शिंगवे येथील गावकरी मंडळी,महाविद्यालयातील शिक्षकवृंद प्रशासकीय कर्मचारी स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

आज नाशिक येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय (नाशिक जळगाव धुळे नंदुरबार)शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे ४ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय यूथ जूनियर व सीनियर...

read more
.