मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सीतालक्ष्मी सभागृहात भव्य दिव्य अशी श्रीराम सहस्त्रनाम जप कलाकृती ही रांगोळी काढण्यात आली असून ही नेत्रदीपक रांगोळी पाहण्यास गर्दी होत आहे. कलाशिक्षक राजन ठाकरे, निलेश जाधव, सुनील इलग यांनी ही भव्य रांगोळी साकारली असून त्यांना शिक्षक किशोर देशपांडे यांच्या सह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले आहे. पाहताक्षणी मनात भरणारी ही नेत्रदीपक रांगोळी चर्चेचा विषय बनली आहे. दोन दिवस ही रांगोळी शालेय वेळेत बघता येणार आहे.संस्था अध्यक्ष,सचिव व संचालक मंडळ तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी या रांगोळीचे कौतुक केले आहे. पहा रांगोळी

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान
जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...