loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत प्रजासत्ताक दिन व पारितोषिक वितरण संपन्न

Jan 26, 2024




मनमाड – येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात शालेय प्रांगणात पार पडला. वैद्यकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या मनमाड शहरातील शिवम डेंटल केअर सेंटरचे प्रसिध्द दंतचिकित्सक डॉ. योगेश मगर व डॉ.सौ. विदया योगेश मगर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित पालक व विदयार्थ्यांसमक्ष आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे डॉ. योगेश मगर यांनी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र दिन यातील फरक विदयार्थ्यांना सुलभ भाषेत समजावून सांगितला. तसेच इतिहास आणि वर्तमानामध्ये श्रेष्ठ व्यक्तिमत्वांच्या योगदानातून त्यांच्यातील कार्याप्रती असणारी प्रबळ इच्छाशक्ती ही सर्व विदयार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. प्यारा ऑलंपिकमधील शितलदेवी हिने हात नसतांनाही तिरंदाजीत मिळविलेले मेडल म्हणजे जिद्द, चिकाटी आणि अनुकुलता व परिपूर्णता नसतांना देखील आपलं ध्येय गाठता येतं याचं उत्तम उदाहरण आहे. तर डॉ. विदया मगर यांनी विदयार्थ्यांनी किती तास अभ्यास करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा व सध्या वाढत्या मोबाईलच्या वापरापासून सुरक्षित अंतर कसं राखावं याच विविध उदाहरणातून विदयार्थ्यांना समजावून सांगितले.

पाहुण्यांचा परिचय शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी करून दिला तसेच प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्यावतीने सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि श्री. मनोज छाबडा हे उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका कु. भारती पवार आणि सौ. स्वाती बिडवे यांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, झेंडागीत व राज्यगीत शालेय विदयार्थी व शिक्षकांनी सादर केले. प्रजासत्ताकदिनाबद्दल रूद्राणी विनोद देशमानकर, समिक्षा शंकर आव्हाड, खुश हरीकृष्ण पाटील या विदयार्थ्यांची उत्स्फुर्त व आवेशपूर्ण प्रभावी भाषणं झाली तर इ.७ वी च्या विदयार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच प्रज्ञेश सतिष आहिरे याने बासरीवादनातून ‘संदेशे आते हैं’ हे देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचलन आश्रय राजेश हजारे आणि हर्षदा कैलास कुदळे यांनी केले. तर वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अथर्व राहूल वाणी, किमया विक्रांत पाठक, चैतन्य जोगदंड, सौम्या सुभाष सिंग, विघ्नेश अजय दराडे, निर्जरा स्वप्निल बुरड, ओम प्रेमकुमार सुर्यवंशी आणि दिव्या रायते या विदयार्थी-विदयार्थिनींच्या जोडगोळीने अत्यंत प्रभावीपणे केले.

वर्षभरात होणा-या विविध उपक्रम व क्रिडा महोत्सवात सर्वाधिक गुण मिळवणा-या गटास गटसम्राट हा मान दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता गटसम्राट हा मान अॅपेक्स या गटाने यंदा पटकावला. पाहुण्यांच्या हस्ते गटाच्या संघनायक व गटप्रतिनिधी शिक्षक यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता शाळेच्या वतीने आयोजित विविध आंतरशालेय स्पर्धेतील जवळ जवळ ३४८ प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

आभारप्रदर्शन संस्था व शाळेच्यावतीने श्री. दिपक व्यवहारे यांनी मांडले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम् ने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी डॉ. प्रदिप साळी, श्री. तुषार चौधरी, श्री. ज्ञानेश्वर माळी, आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
.