loader image
[ays_poll id=7]

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

Jan 30, 2024

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि पत्रकार कैलासवासी माधवराव लिमये यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या कार्यक्षम खासदार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार स्वामी समर्थ सेवा केंद्राचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आणि राज्याचे वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले. यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी वाचनालयाने विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी पुरस्कारातील अभिनंदन करून भविष्यातही त्यांच्या हातून उत्तम समाज कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमा दरम्यान सन्मानपत्र सन्मानचिन्ह ५० हजार रुपयांचा धनादेश शाल पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप देण्यात आले या वेळी दोन्ही मान्यवरांनी नम्रपणे पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्काराच्या रकमेत आपल्याकडून तेवढ्याच रकमेची भर घालून हा निधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी संस्थेकडे सुपूर्द केला.
यावेळी बोलताना डॉ भारती पवार म्हणाल्या की सार्वजनिक वाचनालय या राज्यातील सर्वात जुन्या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार विशेष गौरवाचा आहे पुरस्कार मिळाला की अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते पुस्तकांचे वाचन करण्याचे वेगळे महत्त्व आहे आजच्या पिढीने वाचन करणे गरजेचे आहे वाचन संस्कृतीसाठी सार्वजनिक वाचनालयाने विविध उपक्रम चालू केले आहेत सार्वजनिक वाचनालयाला सी एस आर फंडाच्या माध्यमातून आपण मदत करू वाचनालयाने विद्यार्थिनींसाठी खास अभ्यासिकेची निर्मिती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आमदार राहुल ढिकले, सिमाताई हिरे, दिलीप फडके,वैद्य विक्रांत जाधव,सुनील कुटे, अभिजीत बगदे,देवदत्त जोशी,जयेश बर्वे,गिरीश नातू,जयप्रकाश जातेगावकर,संजय करंजकर,सुरेश गायधनी,प्रेरणा बेळे,शोभाताई नेर्लीकर,प्रशांत जाधव,धर्माजी बोडके,सोमनाथ मुठाळ,मंगेश मालपाठक,प्रशांत जुन्नरे,दीपक खैरनार,विकास देशमुख, रमेश थोरात, हेमंत रावले,यतीन पवार सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.