मनमाड. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.गजानन शेंडगे यांचे वित्तीय साक्षरता संदर्भ पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या उपस्थितीत पार पडले. हे संदर्भ पुस्तक आधुनिक बँकिंग व्यवसायात नित्य उपयोगी पडणारे आणि बँक व्यवहारातील विविध बाबींचा अंतर्भाव असणारे संदर्भ पुस्तक आहे. याचा उपयोग विद्यार्थी त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना बँक विषयी व्यवहार ज्ञानाचे मार्गदर्शन करणारे आहेत. या पुस्तक प्रकाशना प्रसंगी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेतील मानव विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी जी आंबेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.आर.डी भोसले सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राशी भविष्य : ३०ऑगस्ट २०२५ – शनिवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...