loader image
[ays_poll id=7]

आई-बाप हेच मंदिर आहे त्यांची सेवा करा-प्रा.वसंत हंकारे

Feb 8, 2024




नांदगाव: मारूती जगधने पुण्यातील एका वड्यात मुलींना शिकविणारी आई सविञी आहेस मुली तु झाशीची राणी,राणी ताराबाई आहे तु यासह विविध दाखले देत प्रा वसंत हंकारे यांनी सर्वांना गहिवरून टाकले मुली तर अश्रुच ढाळू लागल्या. मुलींनो आई बाबा वर प्रेम करा त्यांचा विश्वास संपादन करा त्यांची मान खाली जानार नाही याची काळजी घ्या असे आवाहन प्रा हंकारे यांनी केले नांदगांव न्युइंग्लीसस्कुल मधील व्याख्यानात ते बोलत होते.
एक वेळ तुम्ही अभ्यासात मागे राहिला तरी चालेल किंवा नापास झाले तरी चालेल पण आयुष्यात असं कोणतंच काम करु नका की,ज्याने आई-बापाला खाली मान घालून समाजात वावरावे लागेल.खाली मान घालून समाजात वावरणारा बाप जिवंतपणीच रोज मरत असतो पोरांनो. म्हणुन जीवनात चांगले काम करायला शिका. आई-बाप हेच खरे मंदिर आहे. त्यांची सेवा करा असे प्रतिपादन लेखक तथा समाज परिवर्तनकार राष्ट्र भूषण पुरस्कार , भारतीय नवजवान पुरस्कार व छत्रपती पुरस्कार विजेते प्रा. वसंत हंकारे यांनी नांदगाव येथील मविप्र संस्थेच्या नांदगाव संकुलातील न्यु. इंग्लिश स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित “न समजलेले आई-बाप” या विषयावर ते बोलत होते. श्रोत्यांना अक्षरशः दिड तास त्यांच्या वाणीने खिळवून ठेवले. सर्वांनाच त्यांनी भावुक करुन सोडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र नांदगाव तालुका संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगावचे संचालक अमित बोरसे होते. तर शाळा व्यवस्थापन समितीचे दिलीप पाटील, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे, रमेश बोरसे, आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे,आई-वडील यांच्यात जवळीकता साधली जावी यासाठी हा उपक्रम मविप्र संचालक अमित बोरसे यांनी हाती घेतला आहे असे प्रास्ताविकातुन भिलारे सर यांनी सांगितले.
तर मविप्र समाज संस्थेला मोठा इतिहास आहे. म.फुले.शाहुमहाराज, डॉ . बाबासाहेब आंबेडकर अशा थोर समाजसुधारकांचा वारसा या संस्थेला लाभलेला आहे. तो वारसा घेऊन संस्थेची वाटचाल चालू आहे. कर्मवीरांची शिकवण घेऊन लोकशाही मार्गाने चालणारी एकमेव मविप्र संस्था आहे. या वर्षापासून येथे सी.बी.एस.सी कोर्स,तसेच वैद्यकीय सेवेसाठी मविप्रची ओ.पी.डी.सुरु करण्याचा मानस आहे. तसेच मुला-मुलींचे वर्तनात बदल घडवुन त्यांच्यात परिवर्तन घडवुन आणण्याचा मानस आहे व त्यांचे चुकीचे पाऊल पडती नये यासाठी असे व्याख्यानांचे उपक्रम घेत आहोत असे संचालक अमित बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे यांनी करुन दिला. हंकारे व्याख्यानातुन पुढे म्हणाले की, या शाळेने अनेक डॉक्टर, वकील, इंजिनिअर, वैज्ञानिक विविध समाजसुधारक घडविले पण या शाळेच्या चार भिंती ने समाजाला चारित्र्यवान माणुस दिला म्हणून या शाळेला विसरु नका. मार्क किती मिळाले याचा विचार न करता आत्मविश्वासाने काम करा यश हमखास मिळते. सावित्रीबाई फुले, पी.टी.उषा, भगतसिंग, राजगुरू, कारगिल युध्दातील कॅप्टन बात्रा, यांसारख्याचा हा देश आहे.मृत्युच्या दारात देशासाठी हसणारी ही माती आहे.म्हणुन सिगारेट,मावा, तंबाखू यासारख्या व्यसनापासून दूर राहून चारित्र्यवान माणूस घडला पाहिजे. बाप उन्हा-तान्हात राबत असतांना तुम्हाला साधे उन्हाचे चटके सहन होत नाही. ही खरी खंत आहे. स्वराज्यातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असावी हा जिजाऊ आईसाहेब यांचा मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव राज्यात होता.शिवाजी महारांच्या आदर्शाचा अंगीकार समाजाने करणे आवश्यक असल्याचे प्रा. हंकारे व्याख्यानातुन म्हणाले. आउ-बापाने दिलेल्या जन्माचे चीज करा. त्यांचे उपकार कधीच विसरू नका. स्वतः घ्या. कर्तृत्वाने मोठे व्हा ,आई-बाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा.मोबाईल मध्ये आवडणाऱ्या हिरो- हिरोईन यांचे फोटो स्टेटसला ठेवण्यापेक्षा आई-वडीलांचे फोटो स्टेटसला ठेवा, आपल्या पोटाला चिमटा घेऊन, अडचणी सहन करुन तुमची सर्व हौस आई-बाप पुरवत असतात. म्हणून त्यांना फसवणुक करु नका. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षांत तीन डिग्री मिळवली कारण त्यांना डोळ्यासमोर आपला बाप दिसत होता. संभाजी महाराजांना मरण समोर दिसत असताना त्यांना डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज दिसत होते. म्हणून मुलांनो बापाशिवाय जीवन पुर्ण होत नाही. म्हणून आई-वडीलांना विसरु नका. कोणत्याही भूल सापांना व प्रलोभनांना बळी पडुन पळुन जाण्याचा मुलींनो प्रयत्न करु नका. व आई-वडीलांना दु:ख देऊ नका असाही संदेश त्यांना पळुन न जाण्याची शपथ प्रा. हंकारे यांनी मुलींना दिली. भाषणात नंतर अनेक मुलींनी व पालकांनी मनोगतातून आम्ही आई-वडिलांचा आदर करण्याची शपथ घेतली. व प्रत्येक घरात बाप हा देवमाणूस आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या आद्य पुरुषांना प्रमुख अतिथी यांनी पुजन केले. स्वागत गीत व पसायदान संगीत शिक्षिका श्रीमती अहिरे व विद्यार्थीनींनी म्हटले . सुत्रसंचलन प्रकाश फणसे यांनी केले तर आभार प्रा.संजय मराठे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद, जेष्ठ नागरिक, नांदगाव संकुलातील मुख्याध्यापक व विद्यार्थी ,प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.