Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

Feb 9, 2024

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या कामाची पाहणी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज केली.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव शहरात निर्माण होत असलेल्या शिवसृष्टी चे कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. नांदगाव शहरातील जुने तहसील कार्यालय येथील जवळपास अडीच एकर जागेवर विशाल अश्वारूढ पुतळ्यासह शिवकालीन शिवसृष्टी निर्माण होत आहे. आमदार सुहास आण्णा कांदे स्वतः जातीने या कामात सतत लक्ष घालताना दिसून येतात. आज सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसृष्टी च्या सुरू असलेल्या कामावर जाऊन पाहणी करून आढावा घेतला.
अडीच एकर जागेवरील शिवसृष्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी ठरणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 29 फुटी असून चौथाऱ्यासह 46 फुट इतकी आहे तसेच शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य शिव-प्रेमींना अनुभवायला मिळणार असून या शिवसृष्टीमध्ये विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कथा पाहायला वाचायला व अनुभवायला मिळणार आहे.
यात महाराजांची जीवन कथा भिंतीवर साकारली जाणार आहे. शिव संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन हत्यारे शिवकालीन वस्तू पाहायला मिळणार आहे, यामुळे भावी पिढीला स्वराज्याचा इतिहास जवळून पाहता येईल आणि समजून घेता येईल.
शिव वाचनालय यामध्ये
शिवकालीन ग्रंथ वाचायला उपलब्ध करून दिले जाणार आहेत . यासह शिवसृष्टी पाहायला येणाऱ्या शिवप्रेमी साठी येथे शिवभोजनालयाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. यानंतर शिव चित्रपटगृह
या संकल्पनेच्या माध्यमातून एक मिनी थियटर या ठिकाणी असणार आहे या शिव चित्रपटगृहात ऐतिहासिक चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे शिवसेनेचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, श्री.चोळके साहेब, सदर कामाचे ठेकेदार यांच्यासह माजी आमदार संजय पवार, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, फरहान दादा खान, उपजिल्हा प्रमुख महेंद्र दुकळे, राजेंद्र देशमुख, नंदू पाटील, सागर हिरे, प्रकाश शिंदे, प्रमोद भाबड, सुनील जाधव, शशिकांत सोनवणे,अय्याज शेख रोहित काकळीज, मंदार ढासे, आदीसह नागरिक उपस्थित होते.
आ. श्री. कांदे यांनी सदर कामाची पाहणी करून कामाबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]