loader image
[ays_poll id=7]

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण – शर्थीचे प्रयत्न ठरले यशस्वी

Feb 10, 2024



वेळीच रुग्णाचे लक्षणं बघून क्षणाचाही विलंब न करता तात्काळ उपचार सुरु केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. या प्रसंगी रुग्णाचे नातेवाईक आणि प्रियजनांनी डॉक्टर व टीम चे आभार मानले. या विशेष प्रसंगी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख व केंद्र प्रमुख डॉ सौरभ नागर यांनी डॉ सुशील अंतुर्लीकर , डॉ तेजस साकळे , डॉ पंकज भट , डॉ स्वप्निल काकड , डॉ अखिलेश सोमाणी, डॉ हितेंद्र महाजन यांचे व सर्व टीमचे अभिनंदन केले.

प्रतिनिधी : एका ५० वर्षीय व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत इमरजेंसी विभागात दाखल झाला. रुग्णाला असामान्य डोकेदुखी व चक्कर येत होती. तत्पूर्वी रुग्ण शिर्डी येथे एका रुग्णालयात डेंगू या आजारावर उपचार घेत होता. परंतु जेव्हा रुग्णाच्या रक्तातील पेशी असामान्य पणे कमी होण्यास सुरवात झाली तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे पुढील उपचार घेण्याचे ठरवले.
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉ सुशील अंतुर्लीकर यांनी रुग्णाची तपासणी केली. रुग्णाची लक्षणे डेंगू आजारापेक्षा वेगळी असल्याचे निर्दर्शनात आले. डॉक्टरांनी तातडीने काही तपासण्या करण्यास सांगितल्या आणि मेंदूविकार तज्ञ डॉ तेजस साकळे यांनाही या रुग्णाच्या लक्षणाबद्दल सांगितले, डॉक्टरांनी रुग्णाचा एम आर आय करायचा सांगितला. सर्व तपासण्या केल्यानंतर असं निर्दर्शनात आले कि, रुग्णाला “म्युकर मायकोसिस” या बुरशी जन्य आजाराची लागण झाली आहे. म्हणून रुग्णाला पुढील उपचारासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे कान नाक घसा शस्रक्रिया तज्ञ डॉ पंकज भट आणि श्वसन विकार तज्ञ डॉ स्वप्निल काकड यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. डॉ पंकज भट यांनी रुग्णाची इंडोस्कोपी करून रुग्णाच्या पुढील उपचाराला सुरवात करण्यात आली.
म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार (Mucormycosis is a Fungal Disease) आहे. म्युकर मायकोसिस हा विषाणू साधारणपणे नाक किंवा सायन्सच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. हा रोग नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करीत असतो. काळी बुरशी, पांढरी बुरशी, आरेंज बुरशी असे बुरशीचे प्रकार आहेत. म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना किंवा मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून आले आहे. वेळीच उपचार घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.
म्युकर मायकोसिस या आजारात उपचार फार मर्यादित असतात. या उपचारात ‘एम्फोटेरेसीन बी’ इंजेक्शन सुरु करावं लागत. ते रुग्णाला पुढील २१ दिवस देण्यात आल. या २१ दिवसात डॉ पंकज भट यांनी डोळ्यापर्यंत पसरलेली बुरशी नियमित साफ करून ती काढून टाकणे तसेच नाक व डोळ्याची नियमित साफसफाई केली. नाकातील बुरशी काढण्यासाठी ‘सायनस इंडोस्कोपी’ म्हणजेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर फुफ्फुसात देखील बुरशीची बाधा झाली आहे असे निर्दशनास आल्यानंतर पल्मोनोलॉजिस्ट ( श्वसन विकार तज्ञ ) डॉ स्वप्निल काकड यांनी ब्रॉन्कोस्कोपी ( दुर्बिणी द्वारे ) फुफ्फुसांमध्ये ब्रॉन्कोस्कोपीक लवाज देऊन उपचार करण्यात आले. यामुळे रुग्णाला फुफ्फुसांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग कमी होण्यास मदत झाली.
डोळ्याची नजर वाचवण्यासाठी डॉ महेंद्र गांगुर्डे यांनी बरेच प्रयत्न केले परंतु त्यात यश आलं नाही. शेवटी या गंभीर आजारातून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी व या जीवघेण्या आजारातून रुग्णाला मुक्त करण्यासाठी नातेवाईकांशी चर्चाकरून बाधित झालेल्या डोळ्यावरील बुरशी मेंदू पर्यंत न जाण्यासाठी आणि निकामी डोळा काढण्यासाठी शस्रक्रिया करून तो काढण्यात आला. म्युकर माकोसिस या बुरशीला शस्रक्रिया करून प्रतिबंध घालण्यात आला आणि रुग्णाला या मुळे नवजीवन मिळाले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.