मनमाड शहरात आज
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला.
रक्तदान हनुमान नगर सत्संग सभा मंडपात आयोजित करण्यात आले होते.या याप्रसंगी 261 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदाते रक्तदान करण्यास गर्दी करून उभे होते मात्र 261 पिशव्या उपलब्ध असल्याने पिशव्या अभावी अनेक रक्तदात्यांना रक्तदान करण्यापासून वंचित रहावे लागले रक्तदात्यांना चहा, बिस्कीट नाश्ता , पाण्याची तसेच प्रत्येक रक्तदात्याला एक टिफिन व प्रमाणपत्र देण्यात आले. मालेगाव ब्लड बँक तर्फे रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.


