मनमाड – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता, आमदार सुहास कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी सहा वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात विधिवत पूजन व रायगडावरील पवित्र जलाने जलाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. रात्री आठ वाजता शिवशाहीर सुरेश जाधव यांचा शाहिरी जलसा त्यानंतर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम होणार आहे.
मनमाड शहरातील लोकशाहीर भाऊ साठे स्मारक अण्णाभाऊ त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचा लोकार्पण झाल्यानंतर आता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.आमदार सुहास कांदे यांच्या
विशेष प्रयत्नातून मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाच्या लोकार्पण सोहळानिमित्त शहरात शिवप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येतआहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आहे रविवारी सायंकाळी हा सोहळा होणार असून सोहळ्याची जय्यत तयारी सध्या शहरात सुरू आहे. ठिकठिकाणी भगव्या कमानी आणि शहर भगवेमय करण्यात येत आहे.