कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी कोल्हापूर येथे सुरू असलेल्या शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मांडला.
शिवसेना पक्षाचे कोल्हापूर येथे पहीले दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या ठिकाणी आमदार सुहास आण्णा कांदे अधिवेशनाच्या माध्यमातून सरकार कडे विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये
कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे तसेच ओबीसी किंवा अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे असा ठराव मांडला.
हा ठराव राज्यासाठी अतिशय महत्वाचा व संवेदनशील मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
या ठरावाला भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अनुमोदन दिले तसेच सर्वांना हात वर करून ठरावाला मंजूर करण्याचे आवाहन केले.


