loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण

Feb 19, 2024


मनमाड – रविवारी शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी गेल्या अनेक वर्षांची प्रलंबित मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे.
आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुतळ्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मेघ डबरीत बसवलेल्या या पुतळ्याचे दिमाखदार व भव्य लोकार्पण सोहळा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणावर आतिष बाजी करण्यात आली.

शिवपुतळ्याचे पुजन, रायगडावरील पवित्र जलाने जलाभिषेक आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमोंनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ च्या जय घोषाने परिसर दणाणून गेला होता.या प्रसंगी आमदार कांदे म्हणाले, की शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी मी केवळ प्रयत्न केले आणि त्याला यश आले आणि आज लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे आणि उपस्थितांच्या वतीने आमदार कांदे, सौ अंजुमताई कांदे आणि फरहान खान यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते यांच्या हस्ते पूर्णाकृती पुढा उभारल्याबइल आमदार सुहास काद, अंजूम कांदे , फरहान खान यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शिवसेना नेते राजेंद्र भाबड, अल्ताफ खान, साईनाथ गिडगे, नाना शिंदे, भाजाचे नेते नितीन पांडे , मुख्याधिकारी शेषराव चौधरी, विविध मान्यवरांचे भाषणे झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केले. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री छत्रपतींच्या पुतळ्याजवळ शिवशाहीर सुरेश जाधव यांचा शाहिरी जल्सा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने मनमाडकर, संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.