loader image

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये मराठी गौरव दिन साजरा

Mar 1, 2024


मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये  मराठी दिन अर्थात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेचे  मुख्याध्यापक फादर मॅल्कम ,पर्यवेक्षिका सिस्टर जोतस्ना,  फादर लॉईड शाळेतील  मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. पारखे मॅडम कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमारी कावेरी वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांतर्फे आदरांजली वाहिली .कुमारी  कावेरी वाबळे हिने आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व विशद केले तर मुख्याध्यापकांनी कुसुमाग्रजांबद्दल माहिती सांगून मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी श्री.अशोक गायकवाड सरांनी ‘ माय मराठी ‘ हे गीत सादर केले. या मराठी दिनानिमित्त ग्रंथपाल श्री.महेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली  जान्हवी सांगळे हिने ‘ एक होता कार्व्हर ‘ या पुस्तकाची  ओळख करून दिली. तनुजा सोनवणे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन प्राची लकदीरे हिने केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.