loader image
[ays_poll id=7]

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

Mar 14, 2024


भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्या अंतर्गत नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे तयार करण्यात आलेल्या ऑफ ट्रॅक रेल कोच रेस्टॉरंट चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष् प्रणाली द्वारे संपन्न झाले.
या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात रेल्वेचा वेगाने विकास झाला आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत कोणत्याही देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत रस्ते रेल्वे आणि हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे भारताच्या विकासात रेल्वेचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे रेल्वे विषयी शासनाच्या विविध योजना जसे एक स्टेशन एक उत्पादन लोकल फोर लोकल यामुळे महिलांनाही चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
यावेळी वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल असलेल्या कारागिराच्या पैठणी विविध उत्पादनाच्या स्टॉलचेही उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ,DSO सुरेश गुप्ता ,DCM अनिल कुमार, SMमनोज श्रीवास्तव,CSCI आशिष नागदेवते, नगरसेवक अंबादास भास्कर, संभाजी मोसकर, संभेराव,रामहरी रामसेज, प्रदीप पाटील,सुनिता गुप्ता, शोभा मोटे, महेंद्र अहिरे, मंदाताई फड, संजय गायकवाड, रेल्वे कर्मचारी सह आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
.