तालुक्यातील ज्या गावांत शेती सिंचनासाठी मर्यादित पाणी साठा किंवा पर्यायी व्यवस्था नाही,अशा आठ गावांतील शेतकऱ्यांना सुमारे ९१ सिंचन विहिरीचा कार्यारंभ आदेशाचे आज आ.सुहास कांदे यांच्या सूचनेनुसार वितरण करण्यात आले.
आ.श्री.कांदे यांनी दृष्काळगस्त तालुक्याची सदयस्थिती व उपलब्ध पाणीसाठा आरक्षित असल्याने या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी शासकीय मदतीने पर्यायी व्यवस्था गरजेचे असल्याचे पटवून देत या ९१ सिंचन विहिरींना मंजुरी मिळवून आणली.
तांदुळवाडी – ०९,पोखरी – ०६, दहेगाव – २५, परधाडी – १०,बिरोळा – १०,चिंचविहीर -: १५, रणखेडा – १५, चांदोरा – ०१ बाबुळवाडी -02 अशा ९3 विहिरींचे कार्यारंभ आदेश माजी सभापती विलासराव आहेर, किरण कांदे, युवासेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे, संचालक दिपक मोरे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, माजी संचालक पुंजाराम जाधव,रमेश काकळीज, प्रकाश शिंदे,आदींच्या हस्ते आज करण्यात आले.
माजी सभापती विलास आहेर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या विहिरींना मंजुरी मिळवण्यासाठी आमदार सुहास अण्णांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.यावेळी पंचायत समितीचे संदीप पारखे,संदीप घुगे,दिनेश पगार,प्रभाकर, दिपक शेलार आदिंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड
नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी...