loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

Mar 29, 2024



मनमाड – महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20 स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु साक्षी शुक्ला हिची निवड करण्यात आली. संघाची निवड विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातील खेळाडुंमध्ये झाली. नंदुरबार जिल्हा संघाकडून खेळण्याचा मान याआधीही साक्षीला मिळाला आहे ज्यात वरिष्ठ संघात खेळाडु तसेच 19 वर्षातील मुलींच्या जिल्हासंघाचे कर्णधारपद तीने भूषविले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या या आमंत्रिताच्या स्पर्धेत मनमाडच्या खेळाडुकडुन  चांगले प्रदर्शन होऊन तिची महाराष्ट्र क्रिकेट संघात संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुला दिली जात आहे. मनमाड शहरातील ही खेळाडु महाराष्ट्र संघात मनमाडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भुमी क्रिकेट अकॅडमीती कसुन सराव करत आहे.

या निवडीसाठी नंदुरबार जिल्हा संघाचे प्रमुख युवराज पाटिल सर यांचे मार्गदर्शन व सहयोग साक्षीस लाभला तसेच भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , हबीब शेख  , सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख ,  सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर ,  रोहित पवार, दक्ष पाटिल , चिराग निफाडकर,  मयुरेश परदेशी , अथर्व बुर्हाडे , शिवराज चव्हाण,  कैलास सोनवणे  तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वाना लाभले असुन श्री गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी या सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

लाड- पागे समितीनुसार चतुर्थश्रेणीतील मैल कामगारांना शासकिय सेवेत घेण्याची मागणी

लाड- पागे समितीनुसार चतुर्थश्रेणीतील मैल कामगारांना शासकिय सेवेत घेण्याची मागणी

नांदगाव : मारुती जगधनेलाड-पागे समिती नुसार इतर जातीचे मेहतर समाजाचे कर्मचार्यांना शासकिय नोकरीत...

read more
कृष्णा व्यवहारे मेघा आहेर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी पूजा परदेशी मुकुंद आहेर यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

कृष्णा व्यवहारे मेघा आहेर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी पूजा परदेशी मुकुंद आहेर यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे २८ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनियर व...

read more
केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

नांदगाव : मारुती जगधने दुभाजक संपताच रस्ता अरुंद असल्याने व त्याठिकाणी दिशादर्शक फलक किंवा...

read more
.