loader image

बघा व्हिडिओ – मोबाईल दुकानला आग लाखो रुपयांचे नुकसान

Mar 30, 2024

बोलठाण प्रतिनिधी , दि. २९…
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील हरिओम मोबाईल शॉप या दुकाकास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील उमेश लालचंद दायमा यांच्या बस स्थानक परिसरात असलेल्या हरिओम मोबाईल शॉप या दुकाकास शुक्रवारी पहाटेच्या सुमारास येथील काही तरुण व नागरिक मॉर्निंग वॉक साठी जात असतांना त्यांना वरील दुकानातून धुर निघत असल्याचे दिसून आले असता त्यांनी दुकानाचे संचालक उमेश दायमा आणि त्यांचे बंधू पत्रकार निलेश दायमा यांच्याशी संपर्क करुन परिस्थिती बाबत माहिती दिली.
दायमा बंधू यांनी दुकानचे शटर उघडून नागरिकांच्या सहकार्याने आग विझवून आतील सामान बाहेर काढले. यामध्ये मोबाईल रिपेअरींग साठी लागणारे साहित्य चार लाख, बेसीक फोन ५० नग पन्नास हजार, जुने मोबाईल एक लाख दहा हजार रुपये, लॅपटॉप आणि इतर मिशनरी दिड लाख, दुकानचे फर्निचर एक लाख रुपये असे आठ लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे येथील तलाठी जयेश मलधोडे यांनी पंचांसमक्ष केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे.
दुकानला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नसून वरील घटने बाबत वाच्यता होताच बोलठाण तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अजून बातम्या वाचा..

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम  स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या स्वच्छ...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
.