मनमाड – भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा चिटणीस नारायण पवार,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे,जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे, नितीन परदेशी,सौ अनिता इंगळे आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे,जिल्हा चिटणीस नारायण पवार,एकनाथ बोडखे, सौ अनिता इंगळे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या ला पुष्पहार अर्पण करण्यात आला महात्मा फुले यांच्या निःस्वार्थ देश सेवा, सामाजिक कार्याची सविस्तर माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी दिली जिल्हा चिटणीस नितीन परदेशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम, क्रांती सूर्य महात्मा फुले यांचा विजय असो, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अश्या घोषणा चा जयघोष करण्यात आला या कार्यक्रमाला भाजपा जेष्ठ कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन, भाजपा मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर, भाजपा शहर उपाध्यक्ष आशिष चावरिया, गजू कासार, कैलास देवरे भाजपा शहर चिटणीस नाजमा अन्सारी,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दिपक पगारे,भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील भाजपा दिव्यांग आघाडी प्रमुख सोनू जयस्वाल भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाबड, भाजपा महिला अनुसूचित मोर्चा जिल्हा सोनाली वाल्मिकी, भाजपा विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष सर्वेश जोशी, भाजपा सोशल मीडिया शहर प्रमुख प्रतीक परदेशी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे आदी भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यां सह मनमाड शहरातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ वारियर कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे सरचिटणीस आनंद काकडे यांनी केले.













