loader image

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

Apr 15, 2024


 

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) ही अशी संस्था आहे जी उच्च शिक्षण, इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे. या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास नॅक अ (३.२२) (NAAC- A) मानांकन मिळाले आहे. याबाबतचे पत्र गुरुवारी, ११ एप्रिल २०२४ ला महाविद्यालयास प्राप्त झाले, अशा प्रकारे नॅककडून अ मानांकन प्राप्त करणाऱ्या देशातील मोजक्याच महाविद्यालयांपैकी कला, विज्ञान व वाणिज्य मनमाड महाविद्यालय एक ठरले आहे.
दिनांक ०५ व ०६ एप्रिल २०२४ रोजी नॅक पिअर टीम च्या मान्यवर सदस्यांनी या दोन दिवस महाविद्यालयाशी संबंधित विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व संस्थेचे प्रतिनिधी तसेच इतर घटकांबरोबर संवाद साधला व महाविद्यालयाविषयी त्यांच्या अपेक्षा व मते जाणून घेतली. त्याचबरोबर महाविद्यालयातील आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा, महाविद्यालयात प्रयोगशाळा, ग्रंथालय सेवा, जिमखाना, परीक्षा विभाग, निरामय आरोग्य केंद्र, प्रशासकीय कार्यालय, तांत्रिक सुविधा, इंटरनेट सुविधा त्याचबरोबर महाविद्यालयात सुरू असलेल्या विद्यार्थिकेंद्रित विविध योजना व सेवा यांसारख्या अत्यंत सूक्ष्म बाबींची शहानिशा करून महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. या दोन दिवसांत महाविद्यालयाचे मुल्यांकन करून केलेला गोपनीय अहवाल बंगरूळच्या नॅक कार्यालयात सादर केला, त्यानुसार महाविद्यालयाच्य गुणवत्तेविषयी प्राप्त गुणांकानुसार अ श्रेणी मिळाली आहे.
महाविद्यालयास नॅक अ (NAAC- A) मानांकन मिळाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, कोशाध्यक्षा डॉ. स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे पाटील, जनसंपर्क विभागप्रमुख डॉ. संपदा हिरे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हरिष आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वत व पंचवटी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व इतर पदाधिकाऱ्यांनी व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संचालक व महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस.एन.निकम, उपप्राचार्य डॉ. बी.एस.देसले आयक्यूएसी व नॅक कोऑर्डिनेटर डॉ. मिलिंद आहिरे व संपूर्ण नॅक टीम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्याथ्यांचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.