loader image

मनमाड शहरात २२ एप्रिल पासून फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स

Apr 19, 2024


मनमाड – फिनिक्स स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून दि. २२/०४/२०२४ पासून सकाळी ०८.०० ते ११.०० या वेळेत ३५ दिवसांच्या कालावधीसाठी इंग्लिश स्पिकींगचा कोर्स सुरू होत आहे.

फिनिक्स स्पोकन इंग्लिश या कोर्सचे २३ व्या वर्षात पदार्पण होत असून आत्तापर्यंत अनेक शहरी, ग्रामिण तसेच सर्व माध्यमाच्या असंख्य विदयार्थ्यांनी अनुभवलेला व १००% निकालाची परंपरा कायम असणारा हा कोर्स आहे. या कोर्समध्ये विदयार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या चारही कौशल्याचे शास्त्रशुध्द पध्दतीने व अत्याधुनिक साधनांचा वापर करून आनंददायी शिक्षण या पध्दतीने मार्गदर्शन केले जाते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास व सभाधीटपणा निर्माण केला जातो. त्यामुळे विदयार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भिती कायमस्वरूपी घालविण्यास मदत होते. कोर्सच्या या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे मनमाडच्या पंचक्रोशीत कोर्सचा नावलौकिक वाढलेला आहे. तसेच पालकांसाठी इंग्रजी विषयाची खात्रीशीर तयार करून घेणारा क्लास म्हणून प्रथम पसंतीचा विश्वास संपादन केलेला आहे.

सदर कोर्स विदयार्थी, शिक्षक व घरी विदयार्थ्यांचा अभ्यास घेणा-या पालकांसाठी तसेच विविध स्पर्धापरिक्षांची तयारी करणा-या विदयार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोर्समध्ये शिकवलेल्या प्रत्येक भागाचे मुल्यमापन वेळोवेळी केले जाते. तसेच शेवटच्या दिवशी पालकांसमक्ष विदयार्थ्यांच्या इंग्लिश स्पिकींगची क्षमता तपासण्याकरीता डेमो ठेवला जातो तसेच कोर्ससाठी लागणारे आवश्यक साहित्य जसे पुस्तक, वही, पेन सर्व टेस्टचे साहित्य कोर्स फीमध्ये विदयार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. कोर्सचे यशस्वी संचलन करण्यासाठी कु. अमिता झाडे तसेच श्री. राम महाले, श्री. राजेश सोनवणे, श्री. प्रविण आहेर, श्री. प्रदिप संसारे, सौ. गौरी जोशी, सौ. राजश्री बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभते.

नांवनोंदणी केलेल्या सर्व विदयार्थ्यांनी व यावर्षी कोर्स करण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत हजर रहावे असे आवाहन फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्सचे संचालक श्री. मुकेश मिसर यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.