मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुलांची ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. मेळाव्याचे उदघाटन पत्रकार निलेशभाऊ वाघ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.माजी न.प. शिक्षण मंडळ सदस्य अशोक सानप यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरीषभाऊ सांगळे , उपाध्यक्ष सचिनभाऊ कांदे , राजाभाऊ पवार यांच्या हस्ते नवगत मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.अंगणवाडी सेविका दयाश्री काळे, रंजना चव्हाण ,अलका सगळे, कविता कदम, वंदना नारखेडे संगीता काळे उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गोरेसर शिक्षक वंदना साखरे मॅडम, नितीन कोल्हे सर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी
मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात युवराज धिवर यांच्या शेतात नांगरणी सुरु असताना...