श्री रामदूत रामप्रिय देवाधिदेव श्री महादेव यांचे अंश रूद्रअवतारी श्री हनुमान जी महाराजांचा जन्मोत्सव एफ.सी.आय रोड येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला, श्री हनुमान जन्मोत्सव
साजरा करण्यासाठी भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सकाळी 5.30 वाजेपासून भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते,
सकाळी 6.00 वाजता श्रीहनुमान जन्मोत्सव ,महाअभिषेक , उपासना, रामरक्षा व हनुमान चालीसा पठन व आरती करण्यात येऊन सकाळी 7.00 वाजेपासून लाडु प्रसादाचे वाटप करण्यात आले,
दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत महाप्रसाद ( भंडारा) ठेवण्यात आले ,त्यात परिसरातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.
दुपारी 4.00 वाजता श्रीदत्त मंदिर भजनी मंडळाचे भजन व
सायंकाळी 6.30 वाजता श्री दत्तोउपासक भजनी मंडळाचे भजन ठेवण्यात आले ,मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन विशेषत: रामायणातील मुख्य प्रसंगाचे चित्रीत देखावे मंदिरात प्रदर्शित करण्यात आले, मंदिरातील सचित्र देखावा रोहन अग्रवाल यांचे संकल्पनेतून साकारण्यात आला
सर्व श्रीराम व हनुमान भक्त व सेवक व इतर समस्त भक्तगण यांचे उपस्थितीत जय श्रीराम जय श्रीहनुमान नावाचा जयघोष करुन श्रीहनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात
मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...