loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्माचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात 10 बळी तसेच रोहित पवार याचीही चमकदार कामगीरी

Apr 27, 2024




मनमाड – सोमवार 22 एप्रिल रोजी  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील तीन खेळाडु नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळत आहे.
2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाड मधील नंदुरबार संघाचा खेळाडु रुषी शर्मा  व रोहित पवार यांनी सामण्यामध्ये उत्तम  प्रदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा अंडर 19 संघाविरुध्द खेळताना या सामण्यात रूषी ने 10 बळी मिळविले , तसेच रोहित पवार याने पहिल्या डावात 49 चेंडुमध्ये 40 धावा जमवल्या ज्यामध्ये 5 चौकार व 1 षटकार  लगावला. अंशुमान सरोदे याने सामण्यात 3 बळी पटकावले. मागील वर्षीही ही महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या आमंत्रिताच्या अंडर 16 सुपरलीग स्पर्धेत पुणे येथे पुणे संघाविरुध्द खेळताना एकाच सामण्यात 10 बळी टिपत यश प्रप्त केले होते व यावर्षीही सलग दुसर्यांदा हि कामगिरी रुषीने केली आहे. मनमाड मधील क्रिकेट प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सर या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाचे संघ प्रशिक्षक तसेच संघव्यवस्थापकाची भुमिका पार पाडत आहे. हे तिन्ही खेळाडु मनमाडचे असुन भुमी क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करतात.

मनमाडमधील या खेळाडुंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर  नंदुरबार संघाला महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या आमंत्रिताच्या अंडर 19 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय प्राप्त करण्यात यश आले. या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळडुंची प्रशंसा केली जात आहे. या स्पर्धेत त्यांनी चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 19 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव युवराज पाटील सर यांनी या खेळाडुंना या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.

नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदे व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान  मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख,  हबीब शेख  , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख ,  सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर ,  दक्ष पाटिल, साहील मोरे , यश रणदिवे , मयुरेश परदेशी ,  चिराग निफाडकर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक  सुखदेव सिंग सर यांचे विशेष सहकार्य लाभले.  त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
.