देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू असून आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले असून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. मनोज जरांगे 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे गणपती मंडळांना निर्माल्य संकलन बॅग वाटप
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक कडून शहरातील पन्नास गणपती मंडळांना निर्माल्य संकलनासाठी बॅगचे वाटप...