लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने स्नॅच मध्ये १३५ किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चांगली कामगिरी करीत स्नॅच या प्रकारात चुरशीच्या लढतीत कांस्यपदक पदक पटकावले
क्लिन जर्क मध्ये १६५ किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलून उत्तम कामगिरी बजावली
अवघ्या एक किलोने हुकले सर्वसाधारण कांस्य
छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेचा खेळाडू असलेला साईराज सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे सराव करत आहे
साईराज परदेशी ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...