मनमाड – सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा सोलापुर येथे खेळवल्या जात आहे. कन्नड संभाजीनगर जिल्ह्य़ांतून निवड चाचणी सामन्यांच्या झालेल्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर मनमाड मधील हसन शेख हा या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या नंदुरबार अंडर 16 संघकडुन निवडला गेला आहे.
2 दिवसीय या कसोटी सामण्यात महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या नंदुरबार जिल्हा संघाकडून खेळताना हसन शेख याने उत्तम असे सामण्यामध्ये प्रदर्शन केले. सोलापुर जिल्हा अंडर 16 संघाविरुध्द खेळताना सामण्यात हसनने 59 चेंडुमध्ये 62 धावा जमवल्या ज्यामध्ये 08 चौकार व 02 षटकार हसनने लगावले.
मनमाडच्या या खेळाडुच्या प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार अंडर 16 संघाला चांगली धावसंख्या करण्यात यश आले.
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धेतील हा तिसरा सामण्याचा आज पहिला दिवस अखेरीस नंदुरबार संघ सर्वबाद झाला परंतु हसनच्या ह्या खेळीमुळे नंदुरबारसंघाने चांगली धावसंख्या प्राप्त करण्यात यश मिळवले. या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळडुची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 16 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्याला देण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव युवराज पाटील यांचे विशेष सहकार्य हसनला प्राप्त झाले.
नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, साहील मोरे , यश रणदिवे , मयुरेश परदेशी , चिराग निफाडकर , रोहित पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.