loader image

बघा व्हिडिओ : खचून जाऊ नका ; शासन तुमच्या सोबतच – ना. दादा भुसे

Jun 10, 2024


मनमाड – जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्व मोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात देवळा तालुक्यातील उमराणे आणि तिसगाव येथे मोठी आर्थिक आणि जीवीत हाणी झाली असून, तिसगाव येथे वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, येथे शेड कोसळून देविदास अहिरे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. उमराणे येथील अनुप पवार यांच्याही कांदा शेडचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी येथील घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तातडीने पंचनामा करून मदत पोहचविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, खचून जावू नका शेतकऱ्यांसोबत सरकार खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करू. यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल. वादळाचा अंदाज घेवून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील भुसे यांनी केले. शासकीय यंत्रणेला देखील सतर्क राहण्याचा सूचना केल्या आहेत. उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव अहिरे (वय ४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गायत्री सूरज देवरे (वय २२) व अभय अजय देवरे (वय साडे तीन वर्षे) हे जखमी आहेत. या वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेड्स व घरांचे नुकसान आहे. या घटनेचे तातडीने पंचनामे करण्याची सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. दरम्यान, उमराणे व तिसगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे जीवित हानी आणि अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आर्थिक नुकसान झाले असून, मुंबई आग्रा महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली. यात वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाला यंत्रणा राबवून तातडीने वीजपुरवठा तसेच सर्व पूर्ववत करण्याची सूचना मंत्री भुसे यांनी दिली आहे. प्रशासकीय यंत्रणेसह आज मंत्री भुसे यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानाची पाहणी केली. या घटनेत तिसगाव येथील दोन व्यक्तींचा आकस्मित मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या कुटुंबीयांची भेट घेत त्यांनी सांत्वन केले. यावेळी चांदवड देवळा मतदार संघाचे आ. डॉ. राहुल आहेर हे देखील उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे.  नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे. नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

मनमाड - गुरुवार 18 एप्रिल 24,  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...

read more
.