loader image

सरकार शेतकरी कल्याणासाठी कटिबध्द – पंतप्रधान मोदी

Jun 11, 2024


मनमाड – नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारताच त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.दरम्यान फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपले सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले, “आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यावर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. भविष्यात आम्हाला शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी मोठे काम करायचे आहेत. रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान फंडच्या निधी संबंधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता मंजूर केला असून या फाइलवर आज स्वाक्षरी केली. या निर्णयाचा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी सकाळी कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिपरिषदेच्या ७१ सदस्यांनीही शपथ घेतली. १ डिसेंबर २०१८ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते. प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता, परंतु आता देशातील सर्व शेतकरी पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात. किसान सन्मान निधीचे आतापर्यंत १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत. १६ वा हप्ता पीम मोदी यांनी यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी ९.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. पीएम-किसानचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०९ कोटी शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक २.०३ कोटी शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (८९.६६ लाख), मध्य प्रदेश (७९.३९ लाख), बिहार (७५.७९ लाख) आणि राजस्थान (७५.७९ लाख) आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची सोमवारी सायंकाळी ५ वाजता पहिली बैठक होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे...

read more
.