loader image

विविध सामाजिक उपक्रमांनी येवल्यात महेश नवमी साजरी

Jun 17, 2024


येवला – येवला शहरातील माहेश्वरी बाँधवांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. महेश नवमी समाज वंशउत्पति दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महेश नवमी निमित माहेश्वरी समाज येवला, माहेश्वरी युवा संघठन व माहेश्वरी महिला मंडळ तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात YMPL-S2 क्रिकेट स्पर्धा,चेस,क्यारम,
चित्रकला,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. वेल्थ मैनेजमेंट व डिजिटल मार्केटिंग वर सचिन मूंदड़ा व योगेश लड्ढा यांचे व्याख्यान झाले. महेश नवमी निमित 50 कदंब वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले व 28 रक्तदात्यानी आपले योगदान दिले.महेश नवमी निमित संध्याकाळी शोभा मिरवणूक काढण्यात आली. त्यात प्रमुख आकर्षण माहेश्वरी युवक युवती आणि लहान मुला मुलीचे झांझ व ढोल पथक ने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले .
गुणवंत विद्यार्थि व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. महाआरती नंतर महाप्रसादचे सगळ्यांनी आनंद घेतला. सर्व माहेश्वरी बांधव व भागिनीं मोठ्या संख्येणे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
.