loader image

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

Jun 28, 2024


मनमाड – नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जय घोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती!’ छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. इयत्ता सातवी आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. इयत्ता दुसरी चा समर सानप इयत्ता सातवीची लावण्या पाटील,गार्गी संधानशिव,समर परदेशी यांनी आपल्या भाषणातून राजश्री छत्रपती शाहू महाराज त्यांच्याविषयी आपले विचार मांडले. 26 जून राजश्री शाहू महाराज यांची जयंती बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष,आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मानाचा मुजरा राजश्री शाहू महाराज हे विशाल मनाचे लोकराजा तसेच कोल्हापूर संस्थेचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 येथील घाटगे घराण्यात झाला. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर,सौ तेजस्विनी चांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आराध्या सांगळे,अंतरा कोठावदे या विद्यार्थ्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी...

read more
.